Skip to main content

Havai'Jaau Dya!'

एखाद्या सिनेमाची जाहिरात पाहुन आपण लगेच ठरवून टाकतो की हा सिनेमा पहायचाच.. 'हवाइजादा' ची जाहिरात पाहुन माझं हेच झालं होतं.. आणि का होणार नाही!! विषयच असा होता..
शिवकर तळपदे नावाच्या मराठी माणसाने संपूर्ण जगात पहिल्यांदा विमान उडवण्याची कामगिरी भारतात आणि ते ही मुंबईत करून दाखवली होती त्याच्या जीवनावरचा हा सिनेमा.. तशी ही कथा मी लहानपणापासून ऐकत आलो होतो आणि त्याचमुळे इतक्या हटके विषयावर एक चित्रपट होवू घालतोय, तळपदेंबद्दल, त्याच्या 'मरुत्-सखा' या विमानाबद्दल, त्याच्या निर्मिती बद्दल अधिक माहिती मिळेल म्हणून हा सिनेमा पहिल्याच दिवशी पाहण्याचा विशेष घाट घातला.. पण पहिल्या पाच मिनिटांतच जाणवल की 'गाड्या काहीतरी बिनसल आहे!'
सिनेमा शिवकर तळपदेंबद्दल असेलहि कदाचित पण त्यांच्या विमान निर्मितिबद्दल तो कितपत आहे असा प्रश्न आपल्याला हळूहळू पडू लागतो..
सिनेमा एका 'शिवी' असं टोपण नाव असणाऱ्या मुलाबद्दल आहे.. (कुठल्या मराठी घरात 'शिवी' असं टोपणनाव ठेवतील??) हा मुलगा चौथीत आठ वेळा नापास झालाय (विकिपीडियाच्या मते शिवकर तळपदे संसृतचे स्कॉलर होते.. मग हा शिवी तोच का?) या मुलाला आधी शाळेतून बाहेर काढतात मग घरातून बाहेर काढतात..मग तो एका नृत्यांगनेच्या प्रेमात पडतो.. मग ती त्याच्या प्रेमात पडते आणि या त्यांच्या प्रेमकथेमध्ये कुठेतरी अधेमधे विमान येत राहत..
लेखक दिग्दर्शकाने आधीच सांगितलं आहे की आम्हाला फारशी माहिती उपलब्ध नसल्यामुळे आम्ही त्यात अनेक काल्पनिक गोष्टींची भर घातली आहे.. आणि ते काही ववगही नाही.. पण सत्यकथेत घातलेल्या काल्पनिक गोष्टींमुळे कथेची परिणामकारकता वाढली पाहिजे जे इथे होत नाही.. सिनेमाच्या उत्तरार्धात कथा खरोखर विमान निर्मितिकडे जाते पण त्यातही निरर्थकशी कोडी, उगाच आणलेली देशभक्ति आणि हे विमान बनतय तरी कुठल्या वैचारिक आधारावर हे न काळाल्याने येणार कन्फ्यूजन यामुळे आपण पडद्यावर जे चालालय ते केवळ बघत राहतो.. बाहेर पडल्यावर आपण गूगलवर नकळत शिवकर तळपदे टाइप करून सर्च करतो आणि त्यातून मिळणारी त्यांची माहिती वाचून तर अधिक कन्फ्यूज होतो, की हा सिनेमा नक्की होता कूणाबद्दल..
पण असं सारं असलं तरी एक मान्य करायलाच हवं की इतकी छोटीशी लाइन हाती असताना लेखक दिग्दर्शक विभु पूरी याने या कथेवर सिनेमा बनवण्याची दाखवलेली हिम्मत आणि जिद्द कौतुकास्पद आहेच.. इतक्या कमी इंफॉर्मेशनवर सिनेमा लिहिण खरच खुप कठीण असतं.. पण जर तो अजुन जास्त परिणामकारक होवू शकला असता तर खरच मजा आली असती यात दुमत नाही..
सिनेमा पाहताना अजुन एक गोष्ट सतत जाणवत राहते ती म्हणजे दिग्दर्शकावर असलेली संजय लीला भंसालीची छाप.. सावरिया या सिनेमाला असोसिएट डिरेक्टर म्हणून काम केल्याचा हा परिणाम असावा बहुतेक पण हवाईजादातहि तीच निळाई पडद्यावर पहायला मिळते..
कपडेही तसेच भंसाली धाटणीचे.. सुंदर, कल्पक पण अनरियलिस्टिक.. सुरुवातीला मराठी पारंपरिक कपड्यांना इतक्या फैशनेबल रुपात पाहताना गम्मत वाटते.. काही कपड्यांच कौतुकहि वाटतं.. पण या सगळ्या झगमगाटीत ती पात्रच खोटी वाटू लागतात..
जे कपड़यांचं तेच आर्ट डिपार्टमेंटचं.. सुरुवातीला भव्य दिव्य निळे निळे इंग्लिश प्रकारचे सुंदर सेट्स बघताना मस्त वाटतं पण मग हळूहळू याच मोजक्या सेट्सवर सिनेमा फिरतोय हे लक्षात येतं आणि त्याचंही कौतुक वीरू लागतं.. आणि या एकंदर प्रकारामुळे सिनेमाचा खरेपणाही हळूहळू कमी होवू लागतो..
छायांकन चांगलं आहे.. गाणी मात्र अगदीच जेमतेम.. भंसालींकडून गाण्याचा कान काही विभु पूरी यांना मिळवता आलेला दिसत नाही..
कलाकारांनी आपली काम चोख करण्याचा प्रयत्न केला आहे.. आयुषमानच्या तोंडी असलेले मराठी संवाद त्याने उत्तम carry केले आहेत.. त्याचं हेच मराठीपण त्याच्या एकंदर व्यक्तिमत्वात दिसलं असतं तर अजुन छान वाटलं असतं..
थोडक्यात काय तर शिवकर तळपदे यांचा जीवनपट पाहण्याच्या विचाराने हवाइजादे पहायला जात असाल तर जरा विचार करा.. पण एक नॉर्मल हिंदी प्रेमकथा म्हणून हवाइजादे एकदा पहायला तशी काही हरकत नाही!!

Comments

Popular posts from this blog

ने मजसी ने

ज्याचं शासन असतं तो स्वतःचेच विचार तिथल्या जनतेवर लादतो.. इतिहासाने ते दाखवून दिलय नेहमी.. लोकशाहीही त्याला अपवाद नाही.. म्हणूनच कदाचित आपल्याकडे जितके गांधी शिकवले गेल...

मराठी सिनेमा via काकण

उद्या काकण सिनेमगृहात एक आठवडा पूर्ण करेल.. या एका आठवड्यात लोकांचा मिळालेला प्रतिसाद अवर्णनिय होता.. लोक थिएटरला जावून सिनेमा पाहतायत.. बरेचसे शोज हाउसफुल झालेयत..इतकं स...