ज्याचं शासन असतं तो स्वतःचेच विचार तिथल्या जनतेवर लादतो.. इतिहासाने ते दाखवून दिलय नेहमी.. लोकशाहीही त्याला अपवाद नाही.. म्हणूनच कदाचित आपल्याकडे जितके गांधी शिकवले गेले तितके सावरकर दुर्लक्षित राहिले.. गांधी व त्याचं कार्य महान होतच.. त्याबद्दल वादच नाही.. पण आज त्रयस्थपणे इतिहासाची पानं चाळताना सावरकर आणि त्यांच्यासारखेच कित्येक क्रांतिकारी भेटतात.. त्यांचे विचार भेटतात.. हे आधी का नाही भेटले असं सतत वाटत राहत.. हे भेटले असते तर कदाचित आमची जडण घडण वेगळी झाली असती.. मान खाली घालून देशप्रेमाच्या बागुलबुवाने कन्फ्यूज झालेली आमची पीढ़ी देशप्रेमची नशा समाजु शकली असती.. शिक्षण घेवुन परदेशात पळायला आतुर झालेल्या आमच्या पिढीला ' जरि उद्धरणी व्यय न तिच्या हो साचा हा व्यर्थ भार विद्येचा' म्हणणारे सावरकर कदाचित योग्य दिशा देवु शकले असते.. 'जय देव जय देव जय जय शिवराया' ही आरती लिहिणार्या सावरकरांकडून कदाचित योग्य आदर्श आणि खरा धर्म समजला असता.. 'सहा सोनेरी पाने' लिहिणार्या सावरकरांकडून जिंकण्यासाठीच लढण्याची जिद्द मिळाली असती.. असे जर तर चे जरतारि प्रश्न मला नेहमी खुणावतात.. पण म्हणतात ना लहानपणी झाले तेच खरे संस्कार.. एक गालावर खाल्यावर दूसरा गाल पुढे करण्याचे संस्कार झालेल्या आम्हाला सावरकर काय पचणार? असो आम्ही फक्त दोन्ही हात जोडायचे आणि म्हणायचं.. 'हे राम!'
Comments
Post a Comment