Skip to main content

SEX!!!

पोस्टचं शीर्षक पाहुन तुमचं लक्ष या पोस्ट कडे गेलच आहे तर आता मी इथे माझ्या मनचं काहीही लिहायला मोकळा कारण तुम्ही या फोटोशी त्याचा संबंध आहे म्हणून ते वाचणार.. जाहिरात क्षेत्रातील ही फार जुनी आणि नेहमीच कामी येणारी ट्रिक.. Sex Sells! सध्या तर या ट्रिकचा वापर प्रचंड वाढला आहे.. सेक्सशी रिलेटेड पोस्टर आणि ट्रेलर दाखवून सिनेमे भरगोस पैसा कमवताना आपण पाहतोय.. व्हरच्युअल जगातही त्याचीच चलती आहे.. दीपिका पादुकोणचा स्त्री सशक्तिकरणा संबंधीचा सध्या प्रचंड गाजत असलेला व्हिडिओ हे त्याचं उत्तम उदाहरण म्हणता येईल.. त्याची हवा इतकी होती की काल मित्राने ख़ास त्याची लिंक मला पाठवली आणि मीही न रहावुन तो पाहिला.. वोग ने आपली जाहिरात करण्यासाठी महिला आणि त्यांचे इमोशन्स यांचा मस्त वापर केलेला दिसतो.. व्हिडिओवर लोकांच्या होणाऱ्या कमेंट्स.. लाइक्स.. शेयर्स.. व्हिडिओ हिट झाला याची ग्वाही देतात.. जिथे घुंगटमधून स्त्रीया पूर्णपणे बाहेर येवू शकलेल्या नाहीत आशा देशात दीपिकाने मंडलेले चॉइजचे मापदंड ऐकून मला तरी भारी गम्मत वाटली.. पायाखालचं सोडून नको त्या गोष्टींची स्वप्न दखावण हे तर जाहिरातवाल्यांच खास स्किल.. त्याला जागुन या व्हिडीओ मध्ये गरजेचे सारे मुद्दे वगळले आहेत हे पाहुन आश्चर्य वाटायला नको.. कारण ती केवळ एका इंटरनॅशनल ब्रॅण्डची जाहिरात आहे.. त्यामुळे भारतात वोगच्या ग्राहक महिलांचे हट्ट फक्त या व्हिडिओत महिला सशक्तिकरणाच्या नावाखाली दाखवले आहेत.. गावाकडच्या बाकी 80% भारताशी आणि तिथल्या महिलांच्या समस्यांशी त्यांना घेणं देणं नाही कारण ही फक्त एक जाहिरात आहे.. जाहिरातींची  ताकद कितीही असली तरी जाहिराती या जाहिराती सारख्याच पहाव्यात.. चिंता फ़क्त इतकिच वाटते की इंटरनेटचं मायाजाल हाती असणाऱ्या तरुण पिढितल्या मुलींनी दीपिकाची ही जाहिरात खरी मानून आपली पुढील आयुष्य आखू नये..  स्वातंत्र आणि स्वैराचार यातली सिमारेशा हा व्हिडिओ पाहुन त्यांनी (आणि पुरुषांनीही) आखू नये.. कारण जाहिरातीतील साबणाची वडी फिरल्या बरोबर शुभ्र चकाकणारे शर्ट, हेल्थ ड्रिंक पिउन पैकीच्या पैकी मार्क आणणारी पोरं, पावडर लावताच भर उन्हात बर्फाच्या खाइत मौज मारू लागणारे परिवार जितके खरे आहेत तितकच दीपिकाच्या व्हिडिओमधलं महिला सबलीकरण खरं आहे..

Comments

Popular posts from this blog

मराठी सिनेमा via काकण

उद्या काकण सिनेमगृहात एक आठवडा पूर्ण करेल.. या एका आठवड्यात लोकांचा मिळालेला प्रतिसाद अवर्णनिय होता.. लोक थिएटरला जावून सिनेमा पाहतायत.. बरेचसे शोज हाउसफुल झालेयत..इतकं स...

ने मजसी ने

ज्याचं शासन असतं तो स्वतःचेच विचार तिथल्या जनतेवर लादतो.. इतिहासाने ते दाखवून दिलय नेहमी.. लोकशाहीही त्याला अपवाद नाही.. म्हणूनच कदाचित आपल्याकडे जितके गांधी शिकवले गेल...