Skip to main content

BABY keeps you on Edge!!

उत्तम पटकथा.. अप्रतिम पात्ररचना.. परिणामकारक संवाद.. ताकदीचे अभिनय आणि अतिशय नेल बाइटिंग असा क्लाइमेक्स.. एका इंटरटेनिंग चित्रपटात जे काही लागतं ते सारे एलिमेंट बेबी या चित्रपटात पुरेपूर आहेत..
वेन्सडे आणि स्पेशल 26 सारखे सिनेमे दिलेल्या नीरज पांडेने ही सुद्धृड आणि सशक्त बेबी प्रेक्षकांना दिलीऐ यात शंका नाही.. चित्रपटाच्या पोस्टर आणि प्रोमोजना चित्रपटाचं 'बेबी' हे नाव कितीही विसंगत वाटत असलं (म्हणजे अगदी अक्षयच्या हे बेबी ची आठवण करून देणार असलं) तरी सिनेमाच्या टायटल्सलाच या नावाचा अर्थ आपल्याला कळतो..
आतंकवादी कारवायांवर आळा बसवायला सरकारने  मर्यादित काळासाठी स्थापन केलेली एक स्क्वार्ड जिचं नाव बेबी आणि त्या स्क्वार्डमधल्या लोकांच्या मिशनबद्दलचा हा सिनेमा म्हणून त्याचं नाव बेबी..
सिनेमाची कथा विचाराल तर सिनेमाला सांगता येईल अशी कथा नाही.. सिनेमा फिरतो तो एका घटनेभोवती.. भारताला विळखा घालून असलेल्या आंतकवादी घाटपातींभोवती आणि त्याला लागून सुरु होणाऱ्या घटनांची उत्कण्ठावर्धक मालिका म्हणजे हा सिनेमा.. हा सिनेमा फ़क्त कथा रुपात सिन मागे सिन असा उलगडत न जाता लेखकाने प्रत्येक पात्राचा स्वभाव, त्यातले बारकावे यांसोबत सिनेमा उलगड़त नेला आहे.. त्यामुळे सिनेमा संपतो तेव्हा फ़क्त प्रमुख पात्र लक्षात न राहता त्यांच्या जोड़ीला असलेला प्रत्येक सहकलाकार आठवत राहतो..
मुरली शर्माने उभा केलेला पिए.. सुशांत सिंगने छोट्याशा रोलमध्ये ओतलेला जिव.. मधुरिमा तुलीने साकारलेली अजय सिंग राठौड़ (अक्षय) ची बायको हे सारे आपल्यावर छाप सोडून जातात.. तिच्या आणि अक्षयच्या सिन्समधून नवरा बायकोची एक लाजबाव केमिस्ट्री उभी राहते.. अटीतटीच्या क्षणी मंत्र्याच्या केबिन बाहेर थांबलेला असताना अक्षयने तिला केलेला एक मेसेज आणि त्यावर आलेला तिचा रिप्लाय!! काहीही न बोलता साकरलेला अप्रतिम सिन म्हणून गणता येईल..
असे अनेक बारकावे घेवुनच सिनेमा पुढे जातो.. पात्रांच्या मनातला विचार आपल्याला ऒळखायला भाग पडतो.. अगदी शेवटच्या क्षणी येणाऱ्या अनपेक्षित कलाटणी पर्यंत..
राणाने साकारलेला जय आपलं काम चोख करतो पण अनुपम खेर यांचा शुक्लाजी मात्र कमाल आहे.. अशी पात्र साकरण्यात त्यांची मास्टरी आहे यात शंकाच नाही.. डैनी डेंजोम्पा याचं कामही अप्रतिम आहे.. त्यांच्या वाट्याला फारशी एक्शन आलेली नसली तरी त्यांचा रुबाब फिरोजच्या पात्रात जान आणतो..
आणि लास्ट बट नॉट द लिस्ट.. अक्षय कुमार.. अशा प्रकारचे रोल त्याने अनेक सिनेमातून केलेले आहेत.. पण त्याच्यातला पॉलिश्ड झालेला नट तुम्हाला खिळवून ठेवतो.. एक्शन मध्ये तो मास्टर आहेच पण या सिनेमातल्या सीन्समधले बारकावे त्यातले इमोशन्स सुद्धा त्याने लीलया आपल्या पर्यन्त पोहोचवले आहेत..
सिनेमाची इतर अंगेहि उत्तम आहेतच.. सिनेमात गाणी नाहिएत हे सगळ्यात उत्तम आहे..
फर्स्ट हाफ ओके ओकेच वाटत असताना अचानक एका रोलरकोस्टर राइडसारखा भन्नाट सेकण्डहाफ अनुभवायला बेबी हा सिनेमा नक्की पहावा.. ज्यांना एक्शन पट हमखास आवडतात त्यांच्यासाठी तर बेबी मेजवानी आहेच पण तो केवळ वरवरचा एक्शनपट नसल्यामुळे उत्तम सिनेमा आवडणार्या प्रत्येकाला आवडेल यात शंका नाही..

Comments

Popular posts from this blog

ने मजसी ने

ज्याचं शासन असतं तो स्वतःचेच विचार तिथल्या जनतेवर लादतो.. इतिहासाने ते दाखवून दिलय नेहमी.. लोकशाहीही त्याला अपवाद नाही.. म्हणूनच कदाचित आपल्याकडे जितके गांधी शिकवले गेल...

मराठी सिनेमा via काकण

उद्या काकण सिनेमगृहात एक आठवडा पूर्ण करेल.. या एका आठवड्यात लोकांचा मिळालेला प्रतिसाद अवर्णनिय होता.. लोक थिएटरला जावून सिनेमा पाहतायत.. बरेचसे शोज हाउसफुल झालेयत..इतकं स...

Havai'Jaau Dya!'

एखाद्या सिनेमाची जाहिरात पाहुन आपण लगेच ठरवून टाकतो की हा सिनेमा पहायचाच.. 'हवाइजादा' ची जाहिरात पाहुन माझं हेच झालं होतं.. आणि का होणार नाही!! विषयच असा होता.. शिवकर तळपदे नाव...