Skip to main content

Posts

Showing posts from 2014

तेथे कर माझे जुळती!

खोखो सिनेमाच्या शूटिंग दरम्यानचा हा किस्सा! सातार्यात 'माहुली' नावाचं क्षेत्र आहे.. फार सुंदर मंदिर.. तिथे आम्ही भरत दादा आणि प्राजक्ता सोबत 'हलकेच नजर भिडली' या गाण्याचं शूट करत होतो..तिथेच हे मारुतीराय दिसले.. प्रसन्न रूप, हसरी मुद्रा.. त्या दिवशी शनिवार का असच काहीतरी होतं.. आमचं सारं शूटिंग यूनिट मारुती रायांना खुश करण्यासाठी हार, फुलं असं बरच काही वाहू लागले.. यूनिटमध्ये भक्तीचा पुर आला.. अ खेर न रहावुन आपणही या मारुतीरायांच्या पाया पडून यावं असं मलाही वाटलं.. मी गेलो.. पाया पडलो.. बरं वाटलं.. तोवर हा जागृत स्वयंभू मारुती आहे वगैरे बरच काही यूनिटमध्ये पसरलं होतं.. लंचपर्यंतचं शूटिंग सुरळीत पार पडलं.. वाटलं मारुती रायाचीच कृपा म्हणायची.. त्याला धन्यवाद म्हणण्यासाठी मी आपला जागृत स्वयंभू मारुतीराया समोर जावून उभा राहिलो.. माझी ती मूक प्रार्थना सुरु असताना तिथला लोकल प्रोड्क्शन पाहणारा माझा मित्र माझ्या जवळ आला.. "छान बनवलाय ना?" तो मारुतीकड़े पाहून म्हणाला.. मला त्याच्या बोलण्याचा अर्थ कळला नाही.. स्वयंभू मारुती, बनवलाय? मी त्याला विचारल्यावर गम...