Skip to main content

Posts

समीक्षकांची समीक्षा!!

काल क्रान्तीने काम केलेला किरण कुलकर्णी VS किरण कुलकर्णी रिलीज झाला.. आणि त्याच्या आलेल्या रिव्ह्यूजने सिनेइंडस्ट्रीशी रिलेटेड अनेक व्हॉट्सअप ग्रुप दणाणून सोडले.. विषय होता वेगवेगळ्या समीक्षकांनी दिलेल्या टोकाच्या प्रतिक्रिया.. काही मोजक्यांनी अकारण सिनेमाला खूप झोडपल होतं आणि इतर समीक्षकांनी मात्र सिनेमाचं खूप कौतुक केलं होतं.. कुणाचं योग्य कुणाचं अयोग्य हा वादातीत मुद्दा म्हणावा पण समीक्षणाचा मराठी सिनेमांवर आणि एकंदरच मराठी सिनेसृष्टीवर होणारा परिणाम यावर काल चांगलाच वाद रंगला आणि अनेक मुद्दे, रादर अनेक लोकांच्या मनातली खदखद बाहेर आली! समीक्षक आणि सिनेमा मेकर्स हा वाद तसा प्राचीन.. सिनेमा बनवणाऱ्यांना नेहमीच समीक्षक खटकत आले आहेत आणि समीक्षकांनी नेहमीच मेकर्सच्या कलाकृतींची मोजमाप काढली आहेत.. काही दिगदर्शकांना सेन्सरबोर्ड जितका जाचक वाटतो तितकेच हे समीक्षक डोळ्यात खुपतात.. आम्ही इतकी मेहनत करून, खर्च करून सिनेमा बनवतो पण हे समीक्षक सरळ सरळ आमची बुराई करतात, सिनेमाला वाईट म्हणतात हि खंत अनेक दिगदर्शकांना असते.. कित्येकजण त्यांच्यासमोर उघड बोलून दाखवत नसले तरीही.. मग समीक्षक आणि त्
Recent posts

मराठी सिनेमा via काकण

उद्या काकण सिनेमगृहात एक आठवडा पूर्ण करेल.. या एका आठवड्यात लोकांचा मिळालेला प्रतिसाद अवर्णनिय होता.. लोक थिएटरला जावून सिनेमा पाहतायत.. बरेचसे शोज हाउसफुल झालेयत..इतकं सारं छान छान आहे, पण.... कित्येक मराठी सिनेमांना ग्रासुन गेलेला हा 'पण' काकणच्या ही वाट्याला येतोय याचं दुःख आहे.. पहिल्या आठवड्यात अनेक थिएटर यशस्वीरित्या गाजवूनही येणाऱ्या दुसऱ्या आठवडयात काकणला थिएटर मिळत नाहिएत.. जणू हा सिनेमा दुसऱ्या आठवड्यात चालणार नाहीच असं गृहीत धरलय.. जेव्हा की नेहमीच गणित हे सांगतं की जो चित्रपट पहिल्या आठवड्यात चांगला बिजनेस करतो तो दुसऱ्या आठवड्यात तूफ़ान चालतो.. लोकांवर चांगल्या आशयघन सिनेमाची जादू पसरायला जो वेळ लागतो तो जर तशा मराठी सिनेमांना मिळणारच नसेल तर काय फायदा.. कालच मी थिएटरमध्ये जावून ब्योमकेश बक्शी पाहिला.. त्याचा तीसरा आठवडा सुरु आहे (I guess) पण तरीही त्याचे भरपूर शोज आहेत.. इतर काही अमराठी सिनेमे तर 5-6 आठवडे होवून गेले तरी थिएटरमध्ये झळकतायत.. मग मराठी सिनेमाशीच हा दुजभाव का? जेव्हाकी सिनेमा मल्टीप्लेक्समध्ये दाखवण्याबद्दल मराठी सिनेमा निर्माते हिंदी किंवा इतर कुठल

SEX!!!

पोस्टचं शीर्षक पाहुन तुमचं लक्ष या पोस्ट कडे गेलच आहे तर आता मी इथे माझ्या मनचं काहीही लिहायला मोकळा कारण तुम्ही या फोटोशी त्याचा संबंध आहे म्हणून ते वाचणार.. जाहिरात क्षेत्रातील ही फार जुनी आणि नेहमीच कामी येणारी ट्रिक.. Sex Sells! सध्या तर या ट्रिकचा वापर प्रचंड वाढला आहे.. सेक्सशी रिलेटेड पोस्टर आणि ट्रेलर दाखवून सिनेमे भरगोस पैसा कमवताना आपण पाहतोय.. व्हरच्युअल जगातही त्याचीच चलती आहे.. दीपिका पादुकोणचा स्त्री सशक्तिकरणा संबंधीचा सध्या प्रचंड गाजत असलेला व्हिडिओ हे त्याचं उत्तम उदाहरण म्हणता येईल.. त्याची हवा इतकी होती की काल मित्राने ख़ास त्याची लिंक मला पाठवली आणि मीही न रहावुन तो पाहिला.. वोग ने आपली जाहिरात करण्यासाठी महिला आणि त्यांचे इमोशन्स यांचा मस्त वापर केलेला दिसतो.. व्हिडिओवर लोकांच्या होणाऱ्या कमेंट्स.. लाइक्स.. शेयर्स.. व्हिडिओ हिट झाला याची ग्वाही देतात.. जिथे घुंगटमधून स्त्रीया पूर्णपणे बाहेर येवू शकलेल्या नाहीत आशा देशात दीपिकाने मंडलेले चॉइजचे मापदंड ऐकून मला तरी भारी गम्मत वाटली.. पायाखालचं सोडून नको त्या गोष्टींची स्वप्न दखावण हे तर जाहिरातवाल्यांच खास स्किल.. त्

ने मजसी ने

ज्याचं शासन असतं तो स्वतःचेच विचार तिथल्या जनतेवर लादतो.. इतिहासाने ते दाखवून दिलय नेहमी.. लोकशाहीही त्याला अपवाद नाही.. म्हणूनच कदाचित आपल्याकडे जितके गांधी शिकवले गेले तितके सावरकर दुर्लक्षित राहिले.. गांधी व त्याचं कार्य महान होतच.. त्याबद्दल वादच नाही.. पण आज त्रयस्थपणे इतिहासाची पानं चाळताना सावरकर आणि त्यांच्यासारखेच कित्येक क्रांतिकारी भेटतात.. त्यांचे विचार भेटतात.. हे आधी का नाही भेटले असं सतत वाटत राहत.. हे भेटले असते तर कदाचित आमची जडण घडण वेगळी झाली असती.. मान खाली घालून देशप्रेमाच्या बागुलबुवाने कन्फ्यूज झालेली आमची पीढ़ी देशप्रेमची नशा समाजु शकली असती.. शिक्षण घेवुन परदेशात पळायला आतुर झालेल्या आमच्या पिढीला ' जरि उद्धरणी व्यय न तिच्या हो साचा हा व्यर्थ भार विद्येचा' म्हणणारे सावरकर कदाचित योग्य दिशा देवु शकले असते.. 'जय देव जय देव जय जय शिवराया' ही आरती लिहिणार्या सावरकरांकडून कदाचित योग्य आदर्श आणि खरा धर्म समजला असता.. 'सहा सोनेरी पाने' लिहिणार्या सावरकरांकडून जिंकण्यासाठीच लढण्याची जिद्द मिळाली असती.. असे जर तर चे जरतारि प्रश्न मला नेहमी खुणावता

Havai'Jaau Dya!'

एखाद्या सिनेमाची जाहिरात पाहुन आपण लगेच ठरवून टाकतो की हा सिनेमा पहायचाच.. 'हवाइजादा' ची जाहिरात पाहुन माझं हेच झालं होतं.. आणि का होणार नाही!! विषयच असा होता.. शिवकर तळपदे नावाच्या मराठी माणसाने संपूर्ण जगात पहिल्यांदा विमान उडवण्याची कामगिरी भारतात आणि ते ही मुंबईत करून दाखवली होती त्याच्या जीवनावरचा हा सिनेमा.. तशी ही कथा मी लहानपणापासून ऐकत आलो होतो आणि त्याचमुळे इतक्या हटके विषयावर एक चित्रपट होवू घालतोय, तळपदेंबद्दल, त्याच्या 'मरुत्-सखा' या विमानाबद्दल, त्याच्या निर्मिती बद्दल अधिक माहिती मिळेल म्हणून हा सिनेमा पहिल्याच दिवशी पाहण्याचा विशेष घाट घातला.. पण पहिल्या पाच मिनिटांतच जाणवल की 'गाड्या काहीतरी बिनसल आहे!' सिनेमा शिवकर तळपदेंबद्दल असेलहि कदाचित पण त्यांच्या विमान निर्मितिबद्दल तो कितपत आहे असा प्रश्न आपल्याला हळूहळू पडू लागतो.. सिनेमा एका 'शिवी' असं टोपण नाव असणाऱ्या मुलाबद्दल आहे.. (कुठल्या मराठी घरात 'शिवी' असं टोपणनाव ठेवतील??) हा मुलगा चौथीत आठ वेळा नापास झालाय (विकिपीडियाच्या मते शिवकर तळपदे संसृतचे स्कॉलर होते.. मग हा शिवी

BABY keeps you on Edge!!

उत्तम पटकथा.. अप्रतिम पात्ररचना.. परिणामकारक संवाद.. ताकदीचे अभिनय आणि अतिशय नेल बाइटिंग असा क्लाइमेक्स.. एका इंटरटेनिंग चित्रपटात जे काही लागतं ते सारे एलिमेंट बेबी या चित्रपटात पुरेपूर आहेत.. वेन्सडे आणि स्पेशल 26 सारखे सिनेमे दिलेल्या नीरज पांडेने ही सुद्धृड आणि सशक्त बेबी प्रेक्षकांना दिलीऐ यात शंका नाही.. चित्रपटाच्या पोस्टर आणि प्रोमोजना चित्रपटाचं 'बेबी' हे नाव कितीही विसंगत वाटत असलं (म्हणजे अगदी अक्षयच्या हे बेबी ची आठवण करून देणार असलं) तरी सिनेमाच्या टायटल्सलाच या नावाचा अर्थ आपल्याला कळतो.. आतंकवादी कारवायांवर आळा बसवायला सरकारने  मर्यादित काळासाठी स्थापन केलेली एक स्क्वार्ड जिचं नाव बेबी आणि त्या स्क्वार्डमधल्या लोकांच्या मिशनबद्दलचा हा सिनेमा म्हणून त्याचं नाव बेबी.. सिनेमाची कथा विचाराल तर सिनेमाला सांगता येईल अशी कथा नाही.. सिनेमा फिरतो तो एका घटनेभोवती.. भारताला विळखा घालून असलेल्या आंतकवादी घाटपातींभोवती आणि त्याला लागून सुरु होणाऱ्या घटनांची उत्कण्ठावर्धक मालिका म्हणजे हा सिनेमा.. हा सिनेमा फ़क्त कथा रुपात सिन मागे सिन असा उलगडत न जाता लेखकाने प्रत्येक पात्

तेथे कर माझे जुळती!

खोखो सिनेमाच्या शूटिंग दरम्यानचा हा किस्सा! सातार्यात 'माहुली' नावाचं क्षेत्र आहे.. फार सुंदर मंदिर.. तिथे आम्ही भरत दादा आणि प्राजक्ता सोबत 'हलकेच नजर भिडली' या गाण्याचं शूट करत होतो..तिथेच हे मारुतीराय दिसले.. प्रसन्न रूप, हसरी मुद्रा.. त्या दिवशी शनिवार का असच काहीतरी होतं.. आमचं सारं शूटिंग यूनिट मारुती रायांना खुश करण्यासाठी हार, फुलं असं बरच काही वाहू लागले.. यूनिटमध्ये भक्तीचा पुर आला.. अ खेर न रहावुन आपणही या मारुतीरायांच्या पाया पडून यावं असं मलाही वाटलं.. मी गेलो.. पाया पडलो.. बरं वाटलं.. तोवर हा जागृत स्वयंभू मारुती आहे वगैरे बरच काही यूनिटमध्ये पसरलं होतं.. लंचपर्यंतचं शूटिंग सुरळीत पार पडलं.. वाटलं मारुती रायाचीच कृपा म्हणायची.. त्याला धन्यवाद म्हणण्यासाठी मी आपला जागृत स्वयंभू मारुतीराया समोर जावून उभा राहिलो.. माझी ती मूक प्रार्थना सुरु असताना तिथला लोकल प्रोड्क्शन पाहणारा माझा मित्र माझ्या जवळ आला.. "छान बनवलाय ना?" तो मारुतीकड़े पाहून म्हणाला.. मला त्याच्या बोलण्याचा अर्थ कळला नाही.. स्वयंभू मारुती, बनवलाय? मी त्याला विचारल्यावर गम